भरड धान्य महोत्सवानिमित्त जालन्यात शाळकरी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

जालना २८ डिसेंबर २०२३ :२०२३ हे सरत वर्ष ‘भरड धान्य’ वर्ष म्हणुन ओळखलं जातंय. मानवी शरीराला पोषक असणाऱ्या विविध गोष्टी भरड धान्यात आहेत, यासाठी गेले वर्षभर शासन आणि सामाजिक स्तरावर या धान्यांविषयी जनजागृती करण्यात आली. असाच एक ‘भरड धान्य महोत्सव’ जालना शहरातील जे.ई.एस. महाविद्यालयात आयोजीत करण्यात आला असून या ठिकाणी भरड धान्य विक्री, खाद्यपदार्थ आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. हा महोत्सव २८ आणि २९ डिसेंबर असा २ दिवस चालणार आहे.

भरड धान्याच्या जनजागृतीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांची भव्य रॅली देखील याठिकाणी काढण्यात आली असुन या रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या रॅली ला सुरुवात होऊन भरड धान्याची जनजागृती करत ही शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली जे. ई. एस महाविद्यालयात दाखल झाली. महोत्सवाच्या या दोन दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान विद्यार्थांच्या या जनजागृती रॅली ने शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा