अंबड, जालना, १५ मार्च २०२४ : जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिन पाळण्यात येतो. या निमित्ताने आज अंबड येथील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटरने मूत्रपिंड आरोग्याबाबत एक दिवसीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले होते.
किडनीविषयक आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी?, किडनी आजार होऊ नये म्हणून दक्षता कशी बाळगावी? तसेच किडनीचा आजार उद्भवल्यास कशा प्रकारे उपचार घ्यावेत? शिव्या मूत्रपिंडाचे मानवी शरीरातील महत्व, मूत्रपिंड आजरावरील उपचारात डायलिसिस प्रक्रियेची आवश्यकता व परिणामकारकता याविषयी प्रा. अन्सारी, प्रा. अशोक काळे व प्रा. मुसीर शेख यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्यविषयक साक्षरता व जागरूकता विद्यार्थीदशेतच व्हायला हवी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याचे केंद्रप्रमुख जगन्नाथ हल्याळ यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी