आर्यलँडचे पंतप्रधान डॉ.लिओ वराडकर मालवनमध्ये

भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी २८ डिसेंबर रोजी आपल्या मूळगावी म्हणजे मालवणात दाखल झाले होते. त्यांनी गावात आगमन करताच संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भारतात मी पाच वेळा आलो होतो. मात्र, माझे आजोबा, वडिल राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. विशेष म्हणजे माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे देखील ते यावेळी पुढे म्हणाले.
त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह गावात एक फेरफटका देखील मारला. त्यावेळी त्यांनी कोणतीही सुरक्षा घेतली नव्हती. विशेष म्हणजे साधे शर्ट आणि पँट यामध्ये त्यांनी प्रत्येकाला हस्तआंदोलन करत गावकऱ्यांची भेट घेतली.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा मुहूर्त साधत डॉ. लिओ वराडकर आपल्या मूळ गावी आले होते. यांच्यासोबत वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले आदि उपस्थित होते. तर सुवासिनींनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी आपल्या घरी आल्यावर कोकणातल्या जेवणाचा आस्वाद देखील घेतला.
डॉ. लिओ वराडकर यांनी मालवणी चिकनचा आस्वाद घेतला आहे. यामध्ये त्यांनी भात, चपाती, आंब्याचे लोणचे आणि खोबऱ्याची चटणीसह मासे अशा विविध मालवणी मेजवानीचा त्यांनी आस्वाद घेतला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा