नवी दिल्ली: अयोध्याप्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांची रविवारी (दि.१७) रोजी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लखनऊ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विषयी जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी माहिती दिली.
यावेळी मदानी म्हणाले की, बाबरी मशीदीत शेवटची नमाज १६ सप्टेंबर १९४९ साली पाडण्यात आली असल्याचे सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले आहे. एएसआयच्या अहवालानुसार कोणतेही मंदीर तोडून मशीद उभारण्यात आलेली नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे.
पर्यायी जागेस नकार : ‘आम्ही दुसरीकडची कोणतीही जागा स्वीकारणार नाही. जी जागा देण्यात येणार आहे. ती आम्हाला मान्य नाही’, असं अखिल भारतीय पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सय्यद कासीम रसूल यांनी सांगितले.
या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष राबे हसन नदवी यांच्यासह असदुद्दीन ओवेसी आणि जफरयाब जिलानी उपस्थित होते.