गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा गदर २’ सोबतच आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चा बॉक्स ऑफिसवर जलवा

गदर २’ सोबतच आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चा बॉक्स ऑफिसवर जलवा

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३: बॉक्स ऑफिसवर तारा सिंगनंतर आता ड्रीम गर्ल पूजाची जादू चालली आहे. आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘ड्रीम गर्ल २’ ने रिलीजच्या ४ दिवसांत चांगली कमाई करून चित्रपटाची किंमत वसूल केली. ड्रीम गर्ल बनून पूजाने सनी देओलच्या दमदार चित्रपट गदर २ ला टक्कर दिली आहे. ड्रीम गर्ल २ हा आयुष्मान खुरानाच्या सुपरहिट चित्रपट ड्रीम गर्लचा सीक्वल आहे, जो चाहत्यांना खूप भावलाय.

आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट वीकेंडला बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. ड्रीम गर्ल २ ने वीकेंडला चांगली कमाई करत ४५.७१ कोटींची कमाई केली. ड्रीम गर्ल २ ने सोमवारच्या परीक्षेतही चांगले नंबर मिळवले असून या चित्रपटाने ४.७० कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाचे जागतिक कलेक्शन ५५.१ कोटींवर पोहोचले आहे.

दुसरीकडे, सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गदर २’ रिलीजच्या १८ व्या दिवशी चांगली कमाई करत आहे. गदर २ ने १८ व्या दिवशी सुमारे ४.५० कोटी कमावले. या आकडेवारीसह, गदर २ ने आतापर्यंत भारतात ४६०.५५ कोटी कमावले आहेत. तिसऱ्या वीकेंडलाही गदर २ ला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. गदर २ ने १६व्या दिवशी रविवारी १६.१० कोटींची बंपर कमाई केली. आता गदर २ चे जगभरातील कलेक्शन ६०० कोटींवर पोहोचणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version