आयुष्यमानच्या ‘बाला’ ने पार केला 100 कोटींचा टप्पा

21

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने १०० कोटी १५ लाख रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटात आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम यांच्यासह सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी, या नव्या-जुन्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली आहे.
२०१९ यावर्षी १०० कोटीच्या क्लबमध्ये सामील झालेला ‘बाला’ हा १५ वा चित्रपट आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा