गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मार्तंड देवसंस्थानाकडून अपंगांना मदत

बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मार्तंड देवसंस्थानाकडून अपंगांना मदत

पुरंदर, दि. ९ जून २०२०: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेजुरीतील मार्तंड देवसंस्थानाच्यावतीने परिसरातील अपंगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या अपंगांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत जेजुरी देवस्थानच्या वतीने ७३ अपंगांना मदत करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने गेली अडीच महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनच्या काळात पुरंदर व परिसरातील दिव्यांग (अपंग ) बांधवांची फार मोठी हलाखीची परिस्थिती असताना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मदतीचा हात म्हणून सुमारे ७३ दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त तुषार सहाणे, शिवराज झगडे, अशोकराव संकपाळ, सॉलि, प्रसाद शिंदे, पंकज निकुडे पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे यांचे हस्ते प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट स्वीकारत केलेल्या मदतीबाबत देवसंस्थानचे आभार मानले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना शासनाच्यावतीने गेली अडीच महिन्यापासून संचारबंदी व लॉकडाऊनच्या कालावधीत अपंग, दिव्यांगांवर उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली असून त्याअनुषंगाने जेजुरी शहर व परिसरातील जेजुरी नगरपालिकेच्यावतीने गतवर्षीचा व यंदाचा ५ टक्के अपंग निधी देण्यात यावा अशी मागणी वारंवार नगरपालिकेकडे करण्यात येत होती.२१ मे रोजी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग (अपंग ) बांधवांनी जेजुरी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा, वीणाताई सोनवणे व मुख्याधिकारी पूनम शिंदे-कदम यांची भेट घेत मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी किमान दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू अपंग बांधवांना देण्यात येऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली होती. यावेळी नगरपालिकेने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच बरोबर स्थानिक अपंगांची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांना मिळताच त्यांनी देवसंस्थान विश्वस्त मंडळाशी संपर्क करीत मदत करण्याचे आवाहन केले, देवसंस्थानच्या वतीने आवाहनाला प्रतिसाद देत जेजुरी शहर परिसरातील अपंगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version