गोल पोस्ट महाराष्ट्र बच्चू कडू यांनी केले दिवंगत कार्यकर्त्याच्या मुलीचे कन्यादान

बच्चू कडू यांनी केले दिवंगत कार्यकर्त्याच्या मुलीचे कन्यादान

अमरावती, दि.मे २०२०: अगदी तारुण्यापासून तर आमदार होईपर्यंत बच्चू कडू यांना सातत्याने साथ देणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचे चार वर्षांपूर्वी अकाली निधन झाले होते. त्यानंतर कार्यकर्त्याच्या कुटुंबाला त्याची उणीव भासू नये यासाठी बच्चू कडू यांच्या पाठीशी उभी राहिले.

दरम्यान आज त्यांच्या मित्राच्या त्या मुलीच्या विवाहात बच्चू कडू व त्यांच्या पत्नी नयना कडू यांनी आई-वडिलांची भूमिका पार पाडली. त्या मुलीचे कन्यादान करून नवदाम्पत्याला लग्नाची भेट म्हणून विमाही काढून दिला.

हा विवाह सोहळा राज्यमंत्री बच्चू कडू यांची निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर डकरे यांचे घरी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला

डकरे यांच्या अकाली निधनाने बच्चू भाऊंनी सुधीर भाऊची जागा लग्नात वडीलांप्रमाणे भरून काढली. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version