गोल पोस्ट इतर राजकारण बच्चू कडू आणि रवी राणात मिलाप

बच्चू कडू आणि रवी राणात मिलाप

मुंबई, ३ नोव्हेंबर, २०२२ : गेले अनेक दिवस खितपत पडलेल्या वादावर अखेर आज पडदा पडला, असं चित्र दिसतयं. रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि अखेर हा वाद संपुष्टात आला. असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

अखेर आमच्यात कुठलाही वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी जे घरात घुसून मारेन हे वक्तव्य केलं, ते मी बच्चू कडू यांच्या बाबतीत केलं नाही. ज्यांनी माझ्यावर ताशेरे ओढले, त्यांच्या बाबतीत मी हे वक्तव्य केलं असं ही त्यांनी नमूद केलं. मी केवळ विकासकामांवर भर देत आहे. मला वाद वाढवायचा नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आता हा वाद खरंच संपला असं जरी रवी राणा म्हणत असले तरी, बच्चू कडू यांच्याकडून अजूनही या वादावर कुठलेच वक्तव्य आले नाही. त्यामुळे आता हा वाद संपला तरी धुसपूस मात्र सुरु आहे, हे नक्की.

यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करत सांगितले की दोन्ही नेत्यांमध्ये काहीतरी गैरसमज झाला असून त्यामुळे हा वाद निर्माण झाला, असं म्हणत बावनकुळे यांनी या वादाला पूर्णविराम दिला आहे. मात्र वास्तव दोन्ही नेत्यांनाच माहित आहे, हे नाकारता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version