बारामती शहरातील दाहव्याचा घाट व स्मशान भूमीची दुरावस्था

4

२८ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्गावरील मुक्ती धाम दाहव्याचा घाट येथे कऱ्हा नदीला आलेल्या पुराणे सगळीकडे चिखल व गाळ साचल्याने दुरावस्था झाली आहे. संरक्षक भिंत पडल्याने भटकी जनावरे आतमध्ये येतात तसेच कऱ्हा नदी पत्राच्या कडेची भिंत एक वर्षापूर्वी पडली आहे, ती अजून तशीच आहे. तर अमरधाम स्मशान भूमीची संरक्षक भिंत पडल्याने नदीचे पाणी आतमध्ये येते आहे. पूर ओसरून पंधरा दिवस झाले तरी पालिका प्रशासन इकडे फिरकले नाही असे संतप्त नागरिकांनी सांगितले.

बारामती शहरातील मुक्ती धाम दाहव्याचा घाटावर बारामती तालुक्यातील गेलेल्या व्यक्तीचे विधी केले जातात. मात्र आता कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे सगळ्या घाटावर तसेच आतमध्ये बसण्याच्या ठिकाणी
चिखल व गाळ साचला असल्याने नागरिकांचा खोळंबा होतो आहे. येथे विधीला देखील पाणी नसते तर येथील वार्षिक ठेका देऊन देखील सगळीकडे गवत वाढले आहे. दुरुस्तीच्या कामात काम पैसे मिळतात म्हणून ठेकेदार दुरुस्तीचे काम घेण्यास टाळतात असे काही जाणकारांनी सांगितले. येथील संरक्षण भिंत पडल्याने भटकी जनावरे आत येऊन घाण करत असतात. तर येथील पाणी आताच्या पावसात गेट तोडून बाहेर काढावे लागले आहे. तर येथील पार्किंग मध्ये गाळ साचल्याने विधीसाठी येणारी वाहने रस्त्यावर लावल्याने गर्दी होते आहे.

पूर ओसरून पंधरा दिवस झाले तरी येथे काही साफसफाई केलेली नाही तर प्रवेश द्वारावर मोठा खड्डा केला आहे. आप्पासाहेब पवार मार्गावर देखील गाळ साचला आहे. कऱ्हा नदीची कडेची भिंत मागील वर्षी आलेल्या पुरात पडलेली भिंत अजून देखील तिथेच पडून आहे, साधी उचलण्याची तसदी देखील पालिका प्रशासनाने घेतली नाही.

यावर्षी मुसळधार पावसाने कऱ्हा नदीला पूर आला होता. येथे काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. श्रीमंत बाबूजी नाईकांच्या वाड्याच्या बाहेर नागरिक चारचाकी गाड्या लावून जातात मात्र हा वाडा जीर्ण झाल्याने ढासळत आहे. हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते येथील लहान पूल दोन वेळा पुरात वाहून गेला आहे. तर काही दिवसांपूर्वी दोन भावांचा जीव वाचला आहे. तर येथे वऱ्हाडच्या गाडीचे चाक रूतून मोठा अपघात टाळला आहे. अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत पडल्याने नदीला पाणी वाढले की ते आतमध्ये येते व अंत्यविधीचा विधी करण्यास अडथळा येतो असे चित्र अनेकवेळा पाहण्यास मिळाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा