कर्जत मध्ये केबल टाकण्यासाठी पुन्हा मुख्य रस्त्यांची केली दुरावस्था

कर्जत, दि. ९ जून २०२०: कर्जत मधील मुख्य रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले आहे. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपूर्वी देखील खोदकाम करून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे काम अधिकाऱ्यांनी चौकशी साठी काही काळ थांबवले होते.

पुन्हा एकदा काल रात्री संबंधीत ठेकेदाराने कर्जत शहरातील मुख्य रस्त्यानजीक पुन्हा एकदा खोदकाम करत केबल टाकण्यासाठी हा रस्ता खोदला आहे. वास्तविक परिस्थिती पाहता केबल टाकण्यासाठी हे काम शासकीय नियमात असल्याचा दावा ठेकेदार करत आहे.

या साठी हा रस्ता किती खोल घ्यावा आणि किती अंतरावर केबल टाकावी या बाबतीत कुठलीही भुमिका या ठिकाणी स्पष्ट होतांना दिसत नाही. याच रस्ताचे काही महिनाने दुरूस्ती खोदकाम होणार आहे. या वेळी या केबलचे पुन्हा एकदा नुकसान होऊ शकते. स्थानिक रस्त्यांचे होणारे नुकसान आणि शासनाचे होणारे नुकसान याबाबत आता महसूल विभाग , बांधकाम विभाग नगरपंचायतने पुढाकार घेऊन या बाबतीत योग्य ते निर्देश देण्याची आवश्यकता आहे. अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा