जळगावच्या चोपडा तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था, तरूणाचे खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन

5

चोपडा, जळगाव २८ नोव्हेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खराब रस्त्यांबाबत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बुधगावातील ऊर्वेश साळुंखे या तरूणाने अंकलेश्वर- बुऱ्हाणपुर राज्य महामार्गावरील खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले.

या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. मागील काळात डॉ चंद्रकांत बारेला यांनी सुध्दा या खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. सध्या अवकाळी पाऊस पडल्याने या महामार्गावरील खड्ड्यात पाणी साचून परिस्थिती आणखीनच बिकट झाली असुन हा महामार्ग २०२२ पासून केंद्र सरकारकडे वर्ग झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची कोणत्याही प्रकारची डागडुजी केली जात नाही.

मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालुन त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा तसेच झोपलेल्या प्रशासनाने माझ्या या आंदोलनाची नोंद घ्यावी आणि कामाला लागावे असे मत याठिकाणी ऊर्वेश साळुंखे या आंदोलकाने मांडले. त्याच्या या अनोख्या आंदोलनाची प्रशंसा करत स्थानिक लोकांनी ऊर्वेशला पाठिंबा दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा