उरुळी कांचन ते पिंपरी सांडस रस्त्याची दुरावस्था

5

उरुळी कांचन, १ नोव्हेंबर २०२०: पिंपरी सांडस पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने मोऱ्या टाकण्यासाठी तसेच रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता उकरण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची आवस्था अत्यंत वाईट बिकट आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने सदर ठिकाणाहून अनेक कारखान्यांची ऊस वाहतूक केली जाते. तसेच, दैनंदिन वाहतूक करणाऱ्या नागरिकांनाही अत्यंत त्रास होत आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून मनस्ताप व्यक्त होत आहे. सदर रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु असताना नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणे महत्वाचे होते, परंतु तसे न करता सदर ठेकेदार, अधिकारी हे मनमानी पध्दतीने कामकाज करत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरी रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट सुरु असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

अपघात झाल्यास सदर अपघाताची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची, सार्वजनिक बांधकाम विभागाची, ठेकेदाराची, कारखान्यांची, ऊस वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची की, सर्व सामान्य नागरिकांची असा सवाल रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल उपाध्यक्ष सुशिल शिंदे पुर्व हवेलि तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल, उपाध्यक्ष सुभाष टिकोळे, पश्चिम हवेली तालुकाध्यक्ष देविदास भोरडे, यांनि विचारला, त्याप्रमाणे रस्त्याचे काम करत असताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून काम करावे अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा