मोरगाव रस्त्यांवरील ड्रेनेज लाईन काढल्याने परिसरात दुर्गंधी

बारामती, ६ फेब्रुवरी २०२१: बारामती मोरगाव रस्त्याचे चौपदरी करणाचे काम जोरात सुरू आहे. यासाठी नवीन रस्त्याच्या मध्ये येणारी जुन्या ड्रेनेज पाईप लाईन काढण्यात येत आहेत. या ड्रेनेज काढल्यामुळे परीसरात अनेक ठिकाणी पाणी साठत असुन सांडपाण्यामुळे बारामती-मोरगाव रस्त्यावरील नवले वस्ती जवळ मोठी दुर्गंधी पसरली आहे.

शहरात प्रवेश करतानाच्या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथे असणाऱ्या नवले वस्ती जवळील जुन्या ड्रेनेज लाईन काढल्या आहेत. या ड्रेनेज लाईन मध्ये येणारे पाणी रस्त्यासाठी खोदलेल्या खड्डयात साठत आहे.

बारामती रस्ता रुंदीकरणाच्या कामात आम्हाला कोणताही त्रास झाला नाही मात्र, येथे काढलेल्या ड्रेनेज लाईन मुळे पाणी साचत आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तर डासांचे प्रमाण वाढलेआहे. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा