गोल पोस्ट स्पॉटलाइट घटस्फोटानंतर बादशाह पुन्हा प्रेमात या पंजाबी अभिनेत्रीला करतोय डेट?

घटस्फोटानंतर बादशाह पुन्हा प्रेमात या पंजाबी अभिनेत्रीला करतोय डेट?

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२२ : पंजाबी आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध रॅपर- गायक बादशहा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर एकदा चर्चेत आला आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार बादशाह हा एका पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे.

बादशाह आणि ईशा एकमेकांना जवळपास एक वर्षापासून डेट करत आहेत, काही मीडिया रिपोर्टनुसार एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली, आणि नंतर या मित्राच्या रूपांतर प्रेमात झाले. दोघे जवळपास एक वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची सिनेमा आणि गण्याबद्दलची पसंत एकच असल्याने ते दोघे जास्त कनेक्ट झाल्याची माहिती आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एका नेटफ्लिक्सची वेबसीरिज फयब्युल्स लाईव्हज ऑफ बॉलिवूड च्या दुसऱ्या सीजन मध्ये बादशहा ने कीमियो रोल केला आहे. यावेळी त्यांनी मीडिया जवळ बोलतांना तो सिंगल असल्याचे सांगितले होते पण आता काही दिवसानंतर ईशा रिखी हिला तो डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version