अतिक्रमण अडथळ्यातील आरोपींना जामीन मंजूर

बारामती, दि.१७ मे २०२०: बारामती शहरातील भिगवणरोड वरील रस्ता रुंदीकरणाला विरोध करणाऱ्या भाजपच्या प्रशांत सातव यांच्यासह चौघांवर ३५३ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील पाचही आरोपींची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

बारामती शहरातील भिगवण रोडवरील सेवा रस्त्यावरील अडथळे काढण्याचे काम बारामती नगर परिषदेने सुरू केले असताना भाजपचे प्रशांत सातव, ऍड सुहास क्षीरसागर ,शिवाजी जाधव ,प्रसाद आगम यांनी काम सुरू असताना विरोध केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी दि.१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपींना शुक्रवार दि. १५ रोजी कोर्टात आणले असता तिथे व्हिडीओ शूटिंग करत असल्याच्या कारणावरून वकील व पोलिसांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता. काल शनिवारी दि.१६ रोजी आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या निर्णय प्रक्रियेत काय निर्णय लागतो हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वकील कोर्टात हजार होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा