कोरेगाव मूळ: दि. १९ ऑगस्ट २०२०: पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या इनामदार वस्ती कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील जेनिथ वाईन शॉप मालकाला धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीचा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गोरख कानकाटे, यांचा पुतण्या मंगेश कानकाटे, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. इनामदार वस्ती येथे १० जुलै रोजी दुपारी वाईन शॉप मध्ये गोरख कानकाटे, यांच्या ऑफिस मधून मी आलो आहे आमच्या गावात धंदा करायचा असेल तर २५ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगून जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले होते.
मात्र त्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी ११ जुलैला वाईन शॉपवर सहा सात जण तोंड बांधून आले व व्यवस्थापकाला पैशाची मागणी करत त्यांनी त्याला मारहाण केल्याप्रकरणी वाईन शॉप मालक सागर मोहेकर, आणि विशाल मोहेकर, यांनी मंगेश कानकाटे, यांच्यासह सहा जणांविरुध्द लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
दरम्यान पोलिसांनी मंगेश कानकाटे यांच्यासह सहा जणांना न्यायालयात हजर केले यावेळी न्यायालयाने मंगेश कानकाटे यांचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऑड. विजेंद्र बडेकर, व अैड. सिद्धार्थ माने व सरकारी वकील गौरी पैठणकर यांनी काम पाहिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी