गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक बकोरी डोंगरावर श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन

बकोरी डोंगरावर श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन

बकोरी, ५ ऑगस्ट २०२० :बकोरी येथे निसर्गाच्या सानिध्यात प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने पुजा-अर्चा होम हवन चालू आहे.

त्यामुळे माहिती सेवा समिती दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान वाघोली यांच्या माध्यमातून बकोरीचे डोंगरावर पिंपळाचे देवरुपी झाडाखाली प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा ठेवून रांगोळी काढून पुजा करण्यात आली. खऱ्या अर्थाने आम्ही रोजच प्रत्येक झाडातच प्रभू रामचंद्र यांना पाहत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आजच्या शुभ मुहूर्तावर पुजा करण्याचे ठरले व त्याप्रमाणे आज करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या समवेत पुजा केली व पुढील काळात ५ लाख वृक्षलागवड करण्यासाठी आम्हाला शक्ती देण्यासाठी प्रभूरामचंद्राना साकडे घातले. त्यांच्या आशिर्वादाने पुढील काही वर्षांत नक्कीच आम्ही सर्वजण ५ लाख झाडे लावण्यात यशस्वी होऊ असा विश्वास शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी बोलताना सांगितले.

यावेळी कार्यक्रमासाठी गणेश जाधव, चैतन्य पवार, धनश्री वारघडे, धणराज वारघडे, चंद्रकांत वारघडे, नवनाथ शितकल, यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व धनश्री वारघडे यांनी छानशी रांगोळी काढली व चैतन्य पवार यांनी नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version