गोल पोस्ट महाराष्ट्र बाळा नांदगावकरांची “सुदाम्याचे राजधन” ही पोस्ट होतेय व्हायरल

बाळा नांदगावकरांची “सुदाम्याचे राजधन” ही पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई, दि.१४ जून २०२०: आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे वाढ दिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र सोशल मीडियावर राज ठाकरेंनवर शुभेच्छांचा वर्षाव काही थांबत नाही. त्यात राज ठाकरे यांचे निष्ठावंत आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली च व्हायरल होत आहे. या पोस्ट मधून त्यांनी राज ठाकरे यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्याचे पहायला मिळत आहे.

या पोस्ट मध्ये बाळा नांदगावकर यांनी ” सुदाम्याचे राजधन” अशी पोस्ट केली आहे. या पोस्ट मधून सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री किती घट्ट होती. हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असे सांगितले की, जेव्हा श्रीकृष्णासाठी सुदाम्याकडे द्यायला काही नव्हते, तसेच आवल्याकडेही राज ठाकरेंसाठी द्यायला काही नाही. असे त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
फक्त ‘निष्ठा’ अर्पण करू शकतो जी मी केली आहे. अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
“तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए” अशी ओळ लिहून बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टचा समारोप केला आहे.

आज १४ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असल्याने वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याने कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे परी पत्रक राज ठाकरे यांनी काढले आहे. तुम्ही जिथे असाल तिथे जनतेला मदत करा असेही त्यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version