बाणेर बालेवाडी मध्ये मद्यविक्री दुकानात सापडले दोन पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे,दि. २३ मे २०२०: औंध भागामध्ये गेल्या आठवड्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. परंतु आता त्यापाठोपाठ बाणेर बालेवाडी मध्ये मद्यविक्री दुकानांमध्ये दोन जणांना कोविड -१९ ची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासह अकरा कामगारांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मद्य विक्री दुकानांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता चिंतेचे वातावरण वाढले आहे. औंध भाग, बाणेर, बालेवाडी हे भाग आतापर्यंत ग्रीन झोन म्हणून मानले जात होते परंतु गेल्या आठवड्यातील एक रुग्ण आणि काल सापडलेले हे दोन रुग्ण पाहता या भागांमध्ये आता रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

संबंधित मद्यविक्री दुकानांतील कर्मचाऱ्यांबरोबरच तिथे आलेल्या ग्राहकांना देखील संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल हातात पडल्यावरच आता समजू शकेल की ग्राहकांना याचा धोका होण्याची कितपत संभावना आहे. २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार औंध, बाणेर, बालेवाडी या भागामध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यातील एक औंध गावातील आहे तर इतर बाणेर व बालेवाडी या भागातील आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा