नवी दिल्ली(वृत्त संस्था): आसाम सरकारने राज्यातले बालविवाह व स्त्रीभृणहत्या रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती योजना’ नावाने आसाम राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे.
या योजनेमध्ये नव्या नवरीला १ तोळा सोने सरकारतर्फे दिले जाणार आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथे स्वतः मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. या योजनेचा राज्याच्या बजेटमध्ये समावेश केला असून, ती आता प्रत्यक्षात येत आहे.
वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबालाच योजनेचा फायदा मिळणार आहे.आसाममध्ये सर्रास १८ वर्षांखालील मुलींचे विवाह होतात. त्याला आवर घालण्यासाठी ही शक्कल लढविली आहे.
त्यामुळे बालविवाह आणि स्त्रीभ्रूणहत्या रोख्यण्यासाठी मोठी मदत मिळेल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.