मुंबई, २१ जुलै २०२२: शिंदे गट सध्या फुल फॉर्मात आहे. आधी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करुन सर्वसामांन्यांना दिलासा दिलाय. तर आता आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्र्यांकडून मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता आरेच्या जंगलात कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचं काम लवकरच पुन्हा सुरु होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी मेट्रो आरे कॉलनीत न होता कांजूरमार्गला हलवली होती. पण शिंदे फडणवीसांनी ही मेट्रो पुन्हा आरेमध्ये आणली. तर तेथे नव्याने झाडे कापण्याची गरज नाही. पावसामुळे कदाचित कामांना वेळ लागेल. मात्र पुढील वर्षात मेट्रो सुरु होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.
याआधी आरेचे कारशेड वाचवण्यासाठी आंदोलने झाली. मुंबईच्या लाडक्या आरेवर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी आरे वाचवण्यासाठी प्रयत्न केला, तर दुसरीकडे मेट्रो 3 चं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी काही नागरिकांकडून होत होती.
उद्धव ठाकरे यांचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी रद्द केला. तर आरे कारशेडमधूनच मेट्रो जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
यावर केवळ सामान्य जनतेतूनच नव्हे तर सिनेसृष्टीतून या प्रकल्पाला विरोध होत होता. यात अभिनेता सुमित राघवन, आरोह वेलणकरने ट्विटरच्या माध्यमातून आपले प्रश्न आणि विरोध दर्शवला होता.
पण आता एकनाथ शिंदेनी आरे कारशेडवरील बंदी उठवून प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला. यामुळे लवकरच आरे कारशेडचे स्वप्न मुंबईकरांना लवकरच अस्तित्वात येताना दिसेल. मात्र त्यामुळे पुन्हा शिंदे-फडणवीस गटाची सरशी होताना दिसत आहे. ही बाब नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

