नगर : दुचाकींचा चोरी करून बनावट कागदपत्रे तयार करून दुचाकी विक्री करणाऱ्या टोळीच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
रूपेश शिवनारायण वर्मा (रा. जुनाबाजार) यांची दुचाकी राहत्या घरासमोरून मंगळवारी चोरीला गेली होती. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. काही व्यक्ती वर्मा यांच्या दुचाकीचे बनावट कागदपत्रे तयार करून तिची विक्री करणार आहे व चोरीची दुचाकी भोसले आखाडा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी आपल्या पथकासह भोसले आखाडा परिसरात सापळा लावून अक्षय जंगम यास चोरीच्या दुचाकीसह अटक केली.
अक्षय विठ्ठल जंगम (रा. भोसले आखाडा, नगर), समीर खोजा शेख (रा. झरेकर गल्ली, नगर), गोरख भारत सुरवाडे (रा. शिवाजीनगर), आकाश अरुण दळवी (रा. केडगाव)
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे तयार करून विकणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्यांच्याकडून ३ लाख १५ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.