नाशिक, नांदगाव १ नोव्हेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे काल मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. यासह नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते यांचा आणि राज्य सरकारचा आंदोलकांनी निषेध केला.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने वाचाळवीरांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. या कडकडीत बंद साठी समस्त व्यापारी बांधवांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला. या कडकडीत बंद मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव पोलिस प्रशासन तर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे