बंगळुरु, १० नोव्हेंबर २०२२ : हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन, बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे उद्घाटन उद्या (११ नोव्हेंबर) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हे टर्मिनल पूर्णपणे बांबू पासून बनवण्यात आलंय. यासाठी सुमारे ५००० कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.
सध्यास्थितीत अस्तित्वात असलेल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे अद्यावत नूतनीकरण करण्यात आलंय. याची उभारणी पूर्णपणे बांबू पासून करण्यात आलीय. या कामासाठी वापरण्यात आलेले बांबू जर्मनीच्या कंपनीकडून बनविण्यात आलेत. यासाठी ३२०० कोटी खर्च आला असून, हे सर्व बांबू व्हिएतनाम देशातून मागविण्यात आलेत. यातील एका बांबूचा वाहतुकीचा खर्च १७०० एवढा आलाय.
या टर्मिनलची पूर्वीची वार्षिक प्रवासी क्षमता अडीच कोटी होती. आता या अद्यावत टर्मिनलमुळं ही क्षमता दुपटीहून जास्त होणार आहे. सुमारे १०,००० स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त जागेवर आकर्षक सजावट करून हे टर्मिनल सुसज्ज करण्यात आलं असून दर्शनीभागात भव्य दिव्य गार्डन उभारण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर