बंगळूर शहरात मुसळधार पावसाचा हौदोस, रस्ते पाण्याखाली तर अनेक वाहने वाहून गेली

5

बंगळूर, दिनांक २० ऑक्टोबर २०२२ : बंगळूर शहरामध्ये बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हौदोस घातला. बेलंदूरच्या आयटी परिसरसह शहराच्या पूर्व, दक्षिण आणि मध्य भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.पावसामुळे शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. हवामान खात्याने बंगळूर शहराला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. संध्याकाळी ७.३० वाजता पाऊस सुरू झाल्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मेट्रो स्टेशनवर आडोसा घ्यावा लागला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेकांची वाहने पाण्यात बुडाली. शहरातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

शहरातील मध्यभागी शिवाजीनगरमध्ये पावसाच्या पाण्यात काही वाहने वाहून गेली आहेत. सखल भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. वाहन तळावर तळघरातील वाहने पाण्यात बुडाली होती. काही इमारतींच्या तळघरातून ओढ्याच्या पुरासारखा लोंढा वाहत असल्याचे दिसून आले. जोरदार झालेल्या पावसामुळे मॅजेस्टिकजवळील भिंत कोसळली त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा