बांगलादेश: राजधानी ढाकामध्ये स्फोट, ७ ठार, ७० हून अधिक जखमी

4

बांगलादेश (ढाका) , २८ जून २०२१: बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या स्फोटात एका मुलासह सात जण ठार झाले. या अपघातात सुमारे ७० लोक जखमीही झाले आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास ढाकाच्या मॉगबाजार वायरलेस गेट भागाजवळ ही घटना घडली.

सुरुवातीला पोलिसांनी याला गॅस स्फोट म्हटले, परंतु अद्याप तपास सुरू आहे. या स्फोटात ५० हून अधिक लोक जखमी झाल्याचं पोलिस आणि अग्निशमन विभागाचं म्हणणं आहे. जखमींपैकी २ जणांना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तर १० जणांना शेख हसीना नॅशनल बर्न अ‍ॅन्ड प्लॅस्टिक इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलंय. इतर जखमींना मोघबाजार परिसरातील अनेक रुग्णालयात नेण्यात आलं.

ढाका महानगर पोलिस आयुक्त शफिकुल इस्लाम यांनी रात्री १०.३० वाजता घटनास्थळाला भेट दिली. या स्फोटात किमान सात लोक ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं. तथापि, मृतांची संख्या वाढू शकते.

ते पुढं म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट असल्याचा पुरावा त्यांच्याकडं नाही. गॅस गळतीमुळं हा अपघात होण्याची शक्यता आहे. परंतु या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन केली जाईल.

या स्फोटामुळं सात इमारती आणि तीन बसचं नुकसान झालं. मीडिया ब्रिफिंगमध्ये अग्निशमन सेवा व नागरी संरक्षण महासंचालक ब्रिगेडियर जनरल सज्जाद हुसेन यांनी सांगितले की हा स्फोट गॅस पाईप किंवा सिलिंडरचा असू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा