गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट बांगलादेशचा भारतावर पहिला ऐतिहासिक विजय

बांगलादेशचा भारतावर पहिला ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या टी२० सामन्यांमध्ये भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान बांगला देशाच्या संघाने सहज पूर्ण केले. बांगलादेशाचा अष्टपैलू खेळाडू मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने हे लक्ष सहज पूर्ण केले.

या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होती. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे. १४९ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version