आशिया कप २०२३ च्या वेळापत्रकावर बांगलादेश क्रिकेट बोर्ड नाराज, म्हणाले -सततच्या प्रवासने खेळाडूंना मानसिक शारीरिक तणाव येऊ शकतो

नवी दिल्ली, १ जुलै २०२३: पुढील महिन्यापासून आशिया कप २०२३ सुरू होत असुन त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्याचवेळी आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट ऑपरेशन्स चेअरमन जलाल युनूस यांनीही स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जलाल युनूस यांचा असा दावा आहे की आशिया चषकाच्या हायब्रीड मॉडेलमध्ये जास्त प्रवास केल्याने खेळाडूंवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पुढील महिन्यात सुरू होणारा आशिया कप पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार असल्याची माहिती आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये तर फायनलसह ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंना त्यांच्या सामन्यांसाठी पाकिस्तान आणि श्रीलंकेला जावे लागेल. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेसह बांगलादेश ब गटात आहे. बांगलादेश ३१ ऑगस्टला श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी बांगलादेश संघाला श्रीलंकेला जावे लागणार आहे. त्यानंतर बांगलादेश ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात अफगाणिस्तानशी सामना करण्यासाठी पाकिस्तानला जाईल.

आशिया चषकाच्या वेळापत्रकाबद्दल जलाल युनूस यांनी म्हटले की, पहिला सामना खेळण्यासाठी आम्हाला लाहोरला जावे लागेल. पहिल्या फेरीत दोन सामने आहेत, एक श्रीलंकेत आणि दुसरा पाकिस्तानमध्ये. आम्हाला जावे लागेल कारण आपण याबद्दल काहीही करू शकत नाही. ३१ ऑगस्टनंतर पुढचा सामना ३ सप्टेंबरला होणार आहे. आम्ही चार्टर्ड विमानांनी प्रवास करू, ही जबाबदारी आसियान क्रिकेट परिषदेची आहे. अर्थातच आम्हाला दर्जेदार विमान कंपनीने प्रवास करायला आवडेल जर ती राष्ट्रीय विमान कंपनी किंवा चार्टर्ड विमान असेल तर नक्कीच सर्वांसाठी चांगले होईल.

जलाल युनूस पुढे म्हणाले, विमानाने प्रवास करणे आणि उड्डाणाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचणे खेळाडूंना मानसिक तणावात टाकू शकते. तथापि, ते पुढे म्हणाला की इतर संघांनी या वेळापत्रकास सहमती दर्शविली असल्याने बांगलादेशला त्यानुसार तयारी करावी लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा