बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कोच यांना कोरोनाची लागण

ढाका, ९ सप्टेंबर २०२०: कोरोना रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या रोगाचा परिणाम आपल्याला सर्वत्र पाहायला मिळालाच आहे. या रोगाचा परिणाम आपल्याला खेळ विश्वातही पाहायला मिळाला आहे. प्रत्येक खेळातील खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे. यातच आज बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज सैफ हसन आणि बांगलादेश क्रिकेट संघाचे कोच निक ली यांना कोरोनाची लागण झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड ने या घटनेची दखल घेतली आहे.आणि दोघांना ही क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे फिजिशियन डॉक्टर देबाशिष यांनी ई. एस. पी. एन. क्रीक इन्फो यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “कोरोना व्हायरसच्या प्रकरणात आम्ही कोच ली यांची चौकशी करत आहोत, हे संक्रमण आधीपासून आहे की आता झाले आहे. याची पडताळणी केल्यानंतरच पुढील रणनीती आखली जाईल.”

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात बांगलादेश संघाचा श्रीलंका दौरा आहे, यासाठी अभ्यास शिबिर या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. तसेच बांगलादेशमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या ३ लाख पेक्षा जास्त केसेस आहेत. आणि ४५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, युएई मध्ये सुरू होणाऱ्या आयपीएल २०२० ची सुरुवात होण्याआधीच कोरोना प्रसाराच्या बातम्या येत आहे. यात खेळाडूंसहित स्टाफचा ही समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा