कोलंबो, ९ सप्टेंबर २०२३ : आशिया कप २०२३ आता त्याच्या ग्रुप स्टेजवरून सुपर-४ फेरीत पोहोचला आहे. आशिया कप स्पर्धेतील सुपर-४ फेरी ६ सप्टेंबरपासून सुरू झाली. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झाला आणि सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागला. आजचा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. सुपर-४ च्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला होता. बांगलादेशसाठी आजचा विजय खूप महत्त्वाचा आहे, तर श्रीलंका आज सुपर-४ मध्ये पहिला सामना खेळणार आहे.
बांगलादेश संघात ऐनवेळी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे आणि त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. विशेष म्हणजे आजचा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी अडीच वाजता होणार आहे.
बांगलादेश -शकीब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद.
श्रीलंका -दासुन शनाका (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रामा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालगे, महिश टीक्षाना, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड