बांगलादेशकडं फक्त पाच महिन्यांचा खजिना, श्रीलंकेप्रमाणे होणार दिवाळखोर!

23

ढाका, 17 मे 2022: भारताचा शेजारी देश श्रीलंका आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाच्या चलनात कमालीची घसरण झाली असून परकीय चलनाचा साठा रिकामा झालाय. दरम्यान, शेजारील बांगलादेशातील परकीय चलनाचा साठाही संपुष्टात येत असल्याची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू, कच्चा माल आणि इंधन, माल वाहतूक इत्यादींच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळं बांगलादेशवर वाईट परिणाम झाला आहे. जुलै ते मार्च या कालावधीत बांगलादेशच्या आयात खर्चात 44 टक्के वाढ झाली आहे.

बांगलादेशच्या वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, ज्या वेगाने बांगलादेशचा आयात खर्च वाढला आहे, त्यानुसार निर्यातीतून उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे व्यापार तूट वाढून परकीय चलनाच्या साठ्यावर दबाव वाढलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापार तूट हळूहळू वाढत चालली आहे आणि बांगलादेश आयात खर्च भागवण्यासाठी देशात जमा झालेले डॉलर विकत आहे.

बांगलादेश केवळ पाच महिन्यांसाठीच आयात खर्च उचलण्यास सक्षम

बांगलादेशचा परकीय चलनाचा साठा कमी होत चालला आहे. देशात जेवढे परकीय चलन शिल्लक आहे, त्यातून पुढील पाच महिन्यांसाठीच आयातीचा खर्च भागवता येईल. जागतिक बाजारातील किमती आणखी वाढल्यास आणि परकीय चलनाचा साठा पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आल्यास बांगलादेशचा आयात खर्च आणखी वाढेल.

सध्या बांगलादेशकडं 42 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बांगलादेशवर आपल्या परकीय चलनाच्या साठ्याची अचूक गणना करण्यासाठी सतत दबाव आणत आहे. जर बांगलादेशने आयएमएफच्या या निर्देशाचं काटेकोरपणे पालन केले तर, निर्यात क्रेडिट फंड, सरकारी प्रकल्प, श्रीलंकेला दिलेली रक्कम आणि सोनाली बँकेत (बांगलादेश स्टेट बँक) ठेवी वगळता उर्वरित परकीय चलन साठ्याची गणना करावी लागेल. या गणनेनंतर बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात 7 अब्ज डॉलरची घट होईल, असं मानलं जात आहे.

परकीय चलनाचा साठा कमी होत असताना बांगलादेशला अजूनही आशेचा किरण दिसतो आहे. बांगलादेशातील निर्यातीतून उत्पन्नात वाढ होण्याचा कल कायम आहे. देशांतर्गत कापड व्यापार, कृषी उत्पादने, चामडे आणि चामड्याच्या उत्पादनांच्या निर्यातीतून बांगलादेशचे उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-एप्रिलमध्ये US$ 1 बिलियनवर पोहोचलं आहे. त्याच वेळी, ताग आणि ताग उत्पादनांमधून निर्यात उत्पन्न देखील सुमारे एक डॉलर आहे.

निर्यातीत भ्रष्टाचार होणार नाही आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केला जाणार नाही याची खात्री बांगलादेशने केल्यास निर्यातीतून परकीय उत्पन्न वाढेल. यामुळे बांगलादेशच्या परकीय चलनाचा साठा कमी होणे टाळता येईल, जरी आयात खर्च वाढत राहिला तरी.

सरकारचे प्रयत्न

दरम्यान, बँक ऑफ बांगलादेशने सध्याच्या डॉलरच्या संकटावर मात करण्यासाठी लक्झरी उत्पादनांच्या आयातीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. शेख हसीना सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरही बंदी घातली आहे. बांगलादेश अधिकारी तुलनेने कमी तातडीच्या प्रकल्पांच्या तात्पुरत्या निलंबनाचा विचार करत आहेत.

अर्थशास्त्रज्ञांनी सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केले आहे आणि संकट अधिक गंभीर होण्यापूर्वी आपत्कालीन आधारावर आणखी काही कठोर उपाय आवश्यक आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा