बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनवर दोन वर्ष क्रिकेट बंदी

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश होणाऱ्या ट्वेंटी-20 सामने सुरू होण्यापूर्वीच बांग्लादेशी पाहुण्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा प्रमुख खेळाडू आणि आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसन याला दोन वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
त्यामुळे बांगलादेश क्रिकेटसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. शकीब याने मॅच फिक्सिंगसाठी बुकीनं संपर्क साधल्याची माहिती आयसीसीच्या लाचलुचपत विभागाकडून लपवली आणि त्यामुळेच त्याच्यावर बंदीची कारवाई झाली. ता कारवाईमुळे क्रिकेट विश्वात एकाच खळबळ उडाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा