गोल पोस्ट राष्ट्रीय बांगलादेशी असल्याच्या कारणावरून २००घरे जमिनोदस्त

बांगलादेशी असल्याच्या कारणावरून २००घरे जमिनोदस्त

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)  : करीममान अग्रहरा परिसरात अवैध बांगलादेशी राहत असल्यावरून १८ जानेवारी रोजी सुमारे २०० कच्चे घरे जमीनदोस्त करण्यात आली होती. येथे अवैध बांगलादेशी राहत असल्यावरून हि कारवाई करण्यात आली. तसेच या परिसरातील वीज आणि पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे.

येथील रहिवाशी मोहम्मद जहांगीर हुसेन यांनी सांगितले की, मी त्रिपुराचा रहिवासी आहे. घर पाडण्यापूर्वी आम्हाला नोटीस देखील देण्यात आली नव्हती. आम्ही बांगलादेशी नाही. आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही भाड्याच्या घरात राहू शकत नाही, म्हणून आम्ही येथे राहतो. माझ्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत. आता याबाबत प्रशासन के पाऊले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version