भारत-बांग्लादेश : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) लागू झाल्यामुळे बांगलादेश मधून भारतामध्ये आलेल्या अवैद्य बांगलादेशी भारत सोडून परत बांगलादेशमध्ये जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. नवीन नागरिकत्व कायदा लागू झाल्यापासून पश्चिम बंगाल आणि आसामला लागून असलेल्या भारत-बांगलादेश सीमेवर खळबळ उडाली आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल फ्रंटियर) या बी खुरानिया म्हणाले की, सुरक्षा दलाने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करीत २६८ बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. बर्डर गार्ड बांगलादेशने (बीजीबी) बंगालला संलग्न असलेल्या पेट्रोपोल सीमेवर ६० जणांना ताब्यात घेतले.
कोठडीत असलेल्या लोकांना नंतर बांगलादेशच्या जेन्नाईदा येथील महेशपूर पोलिस ठाण्यात सुपूर्द केले. बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) चीफ मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विधान केले की भारतीय सीमा ओलांडून बांगलादेशात डोकावण्याचा प्रयत्न करणारे ४४५ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. या वक्तव्यानंतर बांगलादेशी घुसखोरांवर चर्चा अधिक तीव्र झाली.
बीएसएफ मेघालय फ्रंटियरचे आयजी कुलदीप सैनी यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, आतापर्यंतच्या इनपुटवरून असे दिसते आहे की एनआरसीच्या वृत्तामुळे काही बांगलादेशी आपल्या देशात परत आले आहेत. ते म्हणाले की बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे बांगलादेशीही आपल्या देशात परत येत आहेत.