बँकेची NEFT सेवा आजपासून चोवीस तास राहणार सुरू

मुंबई : मोदी सरकार आल्यापासून डिजिटल युग चांगलेच फास्ट झाले आहे. अलीकडच्या काळात मोठया प्रमाणावर ऑनलाईन व्यवहार होत आहेत.

सध्याच्या फास्ट लाईफमध्ये लोकांना बँकेत जाऊन, रांगा लावून व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन सेवा करणे खूपच सोयीस्कर वाटू लागले. मात्र हा ऑनलाईन व्यवहार करतानाही कायद्याची बरीच बंधने असतात. त्यात NEFT (National Electronic Funds Transfer) ची प्रक्रिया ही विशिष्ट कालावधीपुरता मर्यादित होती. मात्र आजपासून या सेवेत बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, ही सेवा 24X7 सुरु करण्यात आली आहे. याआधी केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळातच एनईएफटी व्यवहार करता येत होता.

RBI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, NEFT अंतर्गत आर्थिक व्यवहारांची सुविधा आता आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध होणार आहे. यामुळे ऑनलाईन करणाऱ्या असंख्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. ही सेवा २४ तास सुरु केल्याने सुट्टीच्या दिवशी गैरसोय होणाऱ्या ग्राहकांना याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

सध्या बँकेच्या कामकाज वेळेनंतर ‘एनईएफटी’ चे व्यवहार केल्यास बँका आपणहून तो व्यवहार ‘स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग’ (एसटीपी) माध्यमात वळता करतात. ‘एनईएफटी’द्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो. हा नियम यापुढेही कायम राहील, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

‘एनईएफटी’ चे व्यवहार चोवीस तास उपलब्ध करून दिले जातील, असे रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. त्यानुसार १५ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता NEFT ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

MPC च्या बैठकीनंतर आरबीआय गवर्नर यांनी असे म्हटले आहे की, बँकेच्या वर्किंग डे मध्ये आता २४ तास एनईफटीच्या सुविधेचा लाभ खाते धारकांना घेता येणार आहे. त्याचसोबत आरबीआयने नुकतेच आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्क काढून टाकले आहेत. तर डिजिटल ट्रांजेक्शनला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा