बँक ऑफ बडोदाच्या व्याज दरात घट, हे आहेत नवीन व्याज दर

नवी दिल्ली, १७ मार्च २०२१: सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ बडोदा ने रेपो दराशी लिंक व्याजदरात कपात केली आहे. देशातील तिसरी मोठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदा ने या दरात ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. या कपाती नंतर रेपो लिंक लेंडिंग रेट (आरएलएलआर) ६.८५ वरून घसरून ६.७५ आला आहे. नवीन दर १५ मार्च २०२१ पासून लागू झाले आहेत. बँकेच्या या निर्णया नंतर बँकेची रिटेल कर्जे स्वस्त झाली आहेत. यामध्ये होम लोन, व्यवसाय लोन, शिक्षण लोन, कार लोन, पर्सनल लोन इ. कर्जांचा समावेश आहे.

या निर्णया नंतर होम लोन ६.७५ टक्के, कार लोन ७ टक्के झाले आहे. तर शिक्षण लोन ६.७५ टक्क्यांवर आले आहे. बीओबी चे महाप्रबंधक हर्षद कुमार सोलंकी यांनी सांगितले की, “रेपो दराशी संबंधित व्याजदरातील कपातीमुळे आमच्या ग्राहकांना कर्ज अधिक स्वस्त झाले आहे. आम्ही डिजिटल प्रणाली मध्ये जे सुधार करत आहोत त्यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक सुलभ आणि जलद कर्ज मिळत आहे. ” बीओबी ने आपल्या सर्व कालावधीसाठी मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट कायम ठेवले आहेत. याचा अर्थ असा आहे की, बँकेच्या आत्ताच्या निर्णयाचा फायदा त्याच ग्राहकांना होणार आहे ज्यांचे कर्ज एक्‍टर्नल बेंचमार्क म्हणजेच रेपो रेट शी निगडीत आहे.

यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, आय सी आय सी आय, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी होम लोन या बँकांनी आपल्या व्याज दरात कपात केली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा