बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतील तर सावधान!!

पुणे : जर तुमच्याकडे एका पेक्षा जास्त बँकेत खातं असेल आणि त्यातील एखाद्या खात्याचा वापर होत नसेल तर ते बंद करा. कारण तुम्हाला खातं चालू ठेवण्यासाठी खात्यावर किमान रक्कम ठेवणं गरजेचं असतं. असं केलं नाही तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. खातं बंद करण्यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व डॉक्युमेंट डी-लिंक करावी लागतात. कारणं बँक खातं गुंतवणूक, कर्ज, ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि विमा यांना जोडलेलं असतात.
अनेक बँकांमध्ये खाते असूनही आयकर भरताना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला प्रत्येक खात्याची माहिती द्यावी लागते. यासोबतच खात्यांचे स्टेटमेंटसुद्दा द्यावं लागतं. खात्यावर व्यवहार न केल्यानं तुम्हाला नुकसान होऊ शकतं.
बँकेत खातं उघडल्यापासून १४ दिवसांच्या आत बंद करण्यासाठी कोणतीही आकारणी केली जात नाही. मात्र त्यानंतर एक वर्षापर्यंत खातं बंद करण्यासाठी पैसे आकारले जातात. एक वर्षापेक्षा जुनं खातं असेल तर त्यावर पैसे आकारले जात नाहीत.
बँकेला खातं बंद करण्यापूर्वी तुमच्याकडे न वापरलेलं चेकबुक आणि डेबिट कार्ड असेल तर ते जमा करावं लागतं. तसेच खात्यावर पैसे असतील तर ते दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जातात. जास्त पैसे असतील तर खातं बंद करण्याची प्रोसेस सुरु करण्याआधी ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा आणि त्याचं स्टेटमेंट तुमच्याकडे ठेवा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा