पुढील आठवड्यात देशातील बँका चार दिवस राहणार बंद

पुणे, १० मार्च २०२१ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आयडीबीआय बँक व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली. ज्याचा सतत बँक कर्मचारी संघटनांकडून विरोध होत आहे. आता युनियनने पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत पुढील आठवड्यात जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी शाखेत जावे लागेल तर सर्वात आधी हे जाणून घ्या की बँक कोणत्या दिवशी बंद राहतील. खरं तर खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांनी १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारला आहे.
नऊ बँक संघटनांची केंद्रीय संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हा संप जाहीर केला आहे. या संपाचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या कामकाजावरही संपाचा परिणाम होईल. स्टॉक एक्स्चेंजला देण्यात आलेल्या माहितीत बँक कर्मचार्‍यांच्या संपाचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होऊ शकतो असे बँकेने म्हटले आहे.
कारण बँक संघटनांनी देशव्यापी संप जाहीर केला आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे ग्राहकांना त्रास होऊ शकतो. कारण सरकारी बँका सलग ४ दिवस बंद राहू शकतात. १५ मार्च रोजी सोमवार आहे आणि १६ मार्च मंगळवार आहे, सरकारी बँकेचे कर्मचारी या दोन दिवस संपावर असतील. तर यापूर्वी, १४ मार्च, रविवार आणि १३ मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे. अशा प्रकारे, सरकारी बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असल्यास ११ मार्चपूर्वीच करून घ्या. कारण ११ मार्च ते १६ मार्च दरम्यान, १२ मार्च (शुक्रवार) रोजी फक्त एक दिवस बँक पूर्णपणे कार्यरत असेल. कारण ११ मार्च रोजी महाशिवरात्रीचा सण आहे आणि या निमित्ताने सुट्टीही असेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. खासगी हातात बँका गेल्यामुळे रोजगारावर संकट ओढवू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा