बापरे… डोंबिवलीतील कंपन्यांना टाळा

कल्याण-डोंबिवलीत, दि. २५ जुलै २०२०: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच जात आहे. दररोजचा आकडा हा ३५० ते ६०० च्या मधलाच असतो. त्यामुळे जरी कल्याण-डोंबिवली मध्ये लॉकडाउनला शिथिलता दिली असली तरी देखील हॉटस्पॉटचे भाग हे अद्याप लॉकडाउनमध्ये आहेत. केडीएमसी मध्ये जवळपास ४८ प्रभाग हे हॉटस्पॉट मध्ये आहेत. आणि एमआयडीसीतील बराचसा भाग हा या हॉटस्पॉटमध्ये येतो त्यामुळे कोरोनाने डोंबिवलीतील कंपन्यांना बसवलेलं टाळं हे अद्यापही उघडलेल नाही. आणि याच भितीने शिथिलता मिळून सुद्धा एमयडीसीतील उद्योजक आपल्या कंपन्या सुरू करण्यास तयार नाहीत.

डोंबिवली एमआयडीसीत साधारण ४२० कंपन्या आहेत. मात्र, अनलॉक-१ मध्ये त्यापैकी अत्यावश्यक सेवेतील सुमारे ८५ कंपन्या सुरू झाल्या होत्या. परंतु, केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे त्यापैकी बहुतांशी कंपन्याही भीतीमुळे बंद झाल्याची माहिती कारखानदारांच्या “कामा ” या संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. ते म्हणाले की, कोरोनामुळे उद्योजक घाबरले आहेत. कंपन्या त्यांनी सुरू केल्यास सर्व यंत्रणा त्यांना सहकार्य करेल. मात्र, त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. घरडा केमिकल्स ही मोठी कंपनीही सुरू होऊन पुन्हा बंद करण्यात आली.

४२० कंपन्यांमध्ये जवळपास लाखों कामगार हे काम करतात त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्या बंद असल्यांने कामगारांच्या हातचा पैसा गेला आहे. सुरूवातीला कंपन्यांनी अर्धा पगार दिला मात्र त्यानंतर कंपन्या बंद असल्याने कामगारांना पगार देणे ही बंद झाले आहे. आणि ही परिस्थिती फक्त माताडी कामगार किंवा कमी पगार असलेल्या नोकरदारांचीच नाही तर प्रत्येक नोकरदारांची सध्या हीच परिस्थिती आहे त्यामुळे कोरोनाच्या महामारीत वाढलेल्या माहागाईत कस जगायच हा प्रश्न सध्या सर्वांसमोर उभा आहे. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या लवकर सुरू व्हाव्या अशी इच्छा सध्या कर्मचारी व्यक्त करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा