बारामती शहर पोलिसांकडून गावठी बंदूक व जिवंत काडतूस बाळगणारे आरोपी जेरबंद

बारामती, दि. २४ जून २०२० : बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेत पुढील प्रमाणे माहिती दिली. यामध्ये मंगळवार दुपारच्या नंतर शहर पोलीस स्टेशन हददीत पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व गुन्हे अन्वेषण विभाग बारामती नीरा रोडवर पेट्रोलिंग करीत असतांना एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटार सायकल नंबर (एम.एच १२ एफ.जे ३३३०) वरुन एक व्यक्ती संशयीतरित्या फिरत असतांना दिसला त्यास पोलिसांनी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो व्यक्ती पोलिसांना बघून मोटार सायकल भरदाव वेगाने चालवत नीरारोड म्हसोबा मंदीराच्या शेजारील रस्त्यावर मोटार सायकल टाकुन पळुन गेला.

पळून जात असता पोलिसानी त्यास शिताफीने पकडून त्याच्या कडे चौकशी करून नाव पत्ता विचारला असता
त्याने राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय २४ वर्षे ) रा.कोऱ्हाळे बु ता.बारामती जि.पुणे असे सांगितले.

त्याच्याकडे तपासणी केली असता त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व त्याच्या मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे सापडली. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता हे पिस्तूल प्रतीक भालचंद्र शिंदे (वय २५ वर्षे ) रा.इंदापररोड हरिकृपानगर ता. बारामती जि.पुणे याचे असल्याचे सांगितले.

या नंतर पोलिसांनी प्रतीक शिंदे यांच्या घरात तपासणी केली असता शिंदे याच्याकडे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आढळले या पिस्तूलाची एकुण किंमत १,६०,००० रूपये आहे. वेगवेगळे दोन गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपीना बारामती शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, ओंकार सिताप, पो.कॉ. पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश
पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी या कारवाई मध्ये सहभागी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा