बारामती, दि. १५ जुलै २०२०: बारामती शहरातील गुणवडी रोडवरील समर्थ नगर येथे खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार गांजाची विक्री होत असल्याचे समजल्यावर बारामती शहर पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास छापा घातला असता दोन किलो २५३ ग्रॅम वजनाचा ५३ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला तसेच एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
बारामती शहरात मागील आठवड्यात आमराई परिसरात मोठा गांजाचा साठा पकडला होता. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील समर्थ नगर येथे गांजाची विक्री होत असल्याचे समजल्यावर सापळा रचून काल रात्री नऊ वाजता छापा घातला असता वंदना बाळू सोनवणे उर्फ वंडी हिच्या घराची झडती घेतली असता घरात वापरायची भांडी, पाणी भरण्याचे कुंभारी माठ, प्लॅस्टिकच्या पिशवीत तसेच बेडरूम मधील लोखंडी कपाटात प्लास्टिक पिशवीत ठेवलेला २ किलो २५३ ग्राम गांजा आढळून आला. याबाबत पोलीस शिपाई अकबर शेख यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी वंदना सोनवणे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या कारवाईत पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, स .पो .नी. पद्मराज गंपले पोलीस शिपाई राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, दशरथ इंगोले, अजित राऊत, अकबर शेख, हे या कारवाई मध्ये सहभाग होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव