बारामती नगर परिषदेची अतिक्रमानवर धडक कारवाई

4

बारामती, २१ जानेवारी २०२१: शहरातील मुख्य रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणावर पालिकेने गुरुवार दि.२१ रोजी जोरदार कारवाईचा बडगा उगारला. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडया जप्त करुन यापुढे अतिक्रमण करणाऱ्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बारामती नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना दोन दिवसांपूर्वी समज दिली होती. तरी देखील रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज भिगवण चौकातून कारवाईला सुरुवात करुन पुढे सिनेमा रोड, इंदापुर चौक, गुणवडी चौक, जुनी भाजी मंडई, मारवाड पेठ, स्टेशन रोड, मार्केट यार्ड रोड या शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर लागणाऱ्या हातगाडया, दुकानाच्या समोर टाकलेली लोखंडी जाळी, पदपथावर असणारे बोर्ड, फळांचे कॅरेट , वजन काटे जप्त करण्याची मोहीम उगारल्याने गुरुवारी बाजार दिवशी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रस्त्यावर होणाऱ्या अतिकर्णनामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. आज झालेल्या करवाईमध्ये बारामती नगर परिषदेचे दोन अधिकारी, दहा कर्मचारी, चार पोलीस, सहा होमगार्ड कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पालिकेने यापूर्वी देखील अतिक्रमनावर कारवाई केली आहे. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने परत दोन दिवसांनी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा