बारामती शहर परिसरात बिबट्याची दहशत

बारामती : बारामती शहरातील एमआयडीसी येथील बाऊली कंपणीच्या गेटवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या दिसल्याने बारामती शहरातील आसपासच्या भागात बिबट्याची दहशत पसरली होती. काही दिवसांपूर्वी तांदुळवाडी येथील परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा होती आणि रविवारी रात्री येथे जवळील सावंतविश्व येथे संसश्यास्पद कुत्र्याच्या पिल्लांना मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

बारामतीवरून तांदुळवाडीकडे जात असताना डाव्या बाजूला असणाऱ्या सावंतविश्व या सोसायटीमध्ये ६ इमारती आहे. या इमारतीमध्ये साधारण ८५ कुटुंब वास्तव्य करत आहे. रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कुत्र्यांच्या भुकण्याचं खूप आवाज येत होता. मात्र बिबट्याच्या अफवेमुळे कोणी बाहेर आले नाही.आज पहाटे नागरिक सकाळी फिरण्यासाठी निघाले असता पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना पार्किंग व जवळच कुत्र्यांची ३ पिल्लं रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले कुत्र्याच्या पिल्लांना कुठेही जखम झाली नसून यांच्या नरड्याचा चावा घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. तर येथील लहान कुत्र्यांची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत आहेत. सोसायटीच्या आवारातील दोन मोठी कुत्री देखील सकाळपासून दिसली नसल्याचे येथील रहिवासी रामेश्वरी जाधव यांनी सांगितले.
तसेच पार्किंगमध्ये झटपाट झाल्याच्या खुणा दिसत आहेत. यामुळे फिरायला जाणाऱ्या वयस्कर लोकांनी हा कोणता प्राणी आहे. व हा परिसरातच दबा धरून बसला असेल तर फिरायला जाण्याचे टाळले असे येथील नागरिकांनी सांगितले. सावंतविश्व या सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणात झाडे असून येथे उसाची शेती आहे. मागील काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे ९ कुत्र्यांच्या पिलांना एकाच दिवशी मारले होते. त्यावेळी नागरिकांनी या घटनेकडे कानाडोळा केला होता. मात्र आता बिबट्याच्या चर्चे मुळे येथील रहिवासी घाबरले असून लहान मुलांना ते खेळण्यासाठी देखील बाहेर सोडत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. आज मारलेल्या कुत्र्याच्या पिलांमुळे हा कुठला प्राणी आहे. बिबट्या, तरस का लांडगा असल्याची शक्यता येथील रहिवाश्यांनी वर्तविली आहे. याबद्दल वनविभागाने माहिती घ्यावी अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा