बारामती : देशभरातील सर्व मोबाईल देशात बंद पुकारला. या बंदमध्ये आज बारामती शहरातील सर्व मोबाईल दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी होत कडकडीत बंद पाळला.आज भिगवण चौक येथील हुतात्मा थांबाजवळ शहरातील सर्व मोबाईल दुकानदारांनी हातात ऑनलाईन मोबाईल विक्री विरोधात बंद असल्याचे पोस्टर घेऊन आज शहरात बंद पाळण्यात आला. यानंतर इंदापूर चौक गुणवडी चौक गांधी चौक येथे देखील ऑनलाईन मोबाईल विक्री च्या विरोध दर्शविण्यात आला. यावेळी शहरातील सर्व मोबाईल दुकानदार व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. अनैतिक पद्धतीने ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑफर केलेली ऑनलाईन सवलत थांबविण्यात यावी, ई-कॉमर्स कंपन्यांचे नियमन करण्यासाठी नियामक प्राधिकरण तयार केले पाहिजे, जेणे करून या कंपन्या एफ डी आय कायद्याचे उल्लंघन करू नयेत आणि प्रत्येकाला व्यवसायाची समान संधी मिळेल. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन कडून आतापर्यंत प्रेस नोट दोनच्याआपल्या विशिष्ट उत्पादनांनी ब्रँड ई-कॉमर्स बंद केला आणि सर्व उत्पादनांनी समान उत्पादन समान वजन समान किंमत आणि किंमत प्रदान करावी उल्लंघन आत गैरवापर झालेल्या एफडीआय निधीची चौकशी करावी. कॅश ऑन डियाबाबत लिव्हरी सारख्या क्रियाकलाप थांबवाव्यात, व्यापारांना दहा लाखापर्यंत कर्ज विना तारण द्यावे, आपल्या विशिष्ट उत्पादनांनी ब्रँड ई-कॉमर्स बंद केला आणि सर्व उत्पादनांनी समान उत्पादन समान वजन समान किंमत प्रधान करावी, ऑनलाईन आणि ऑफलाईन मधील किमतीचा फर्क थांबा आणि ऑनलाइन कोणत्याही पद्धतीचा डिस्काउंट देऊ नये असा ठराव करावा, जर ब्रँड असे करण्यात अपयशी ठरला तर किरकोळ विक्रेता व होलसेल विक्रेत्याकडून फरक वसून करेल या महिन्यात रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने दुकानदारांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बारामती शहर अध्यक्ष प्रीतम टाटिया उपाध्यक्ष रोहन शेरकर यांनी दिली.
यावेळी शकील पठाण, प्रदीप दोशी, अनिस कोलबोवाला, परेश विरकर, आदिल पटेल, अभय गादिया, रोहन वागजकर,तसेच बारामती शहरातील सर्व दुकानदार व कंपनीचे प्रमोटर उपस्थित होते.