लॉकडाउन मध्ये बारामती उपविभागाची धडक कारवाई

बारामती, दि. १ जुलै २०२०: बारामती शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने लॉकडाऊनच्या काळात पोलीस प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर बारामती उपविभागात सुमारे  १ हजार ४२५ कारवाया करण्यात आल्या यामध्ये शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.

सध्या देशात करोना संसर्गाने धुमाकूळ घातला असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती उपविभागात पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनासह, प्रशासनाने उत्तम कामगिरी बजावत आपले कर्तव्य बजावल्याने कोरोनाला इतर शहरांच्या मानाने बारामती तालुक्यात थोपवण्यात यश मिळवले. यामध्ये लॉकडाउनच्या काळात पोलीस प्रशासनाने बारामती उपविभाग हद्दीतील बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व इंदापूर, वालचंदनगर, भिगवण या ठिकाणी रस्त्यावर बिनकामाचे फिरणाऱ्या, समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणे, मास्कचा वापर न करणे, अवैद्य दारू विक्री तसेच टाळेबंदीत मनाई असतानाही दुकाने चालू ठेवणे करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या दराने विक्री करणे तसेच विनापरवानगी प्रवास करणाऱ्या १ हजार
४२५ नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये ६७ लोकांना शिक्षा देखील झाली आहे या कायदेशीर बडग्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करण्याचे टाळले असून नियमांचे पालन करत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा