बारामती: कृषी विज्ञान केंद्र शारदानागर येथे देशातील एकमेव कृषिक प्रतिक्षिकेयुक्त कृषी प्रदर्शन दिनांक १६ ते १९ रोजी सकाळी ९.३० ते सायं ६.३० वाजेपर्यंत असणार आहे.या प्रदर्शनात स्टेजवरील कार्यक्रम न करता शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा माहिती घेऊन त्याचा आपल्या गावाला फायदा व्हावा यासाठी चांगल्या कंपनी आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना आम्ही कृषिक प्रदर्शनातून देणार आहोत असे अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी संगीतले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राकडून २०१४ पासून कृषिक प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनात राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित असतात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना ऑन लाईन नोंदणी करण्यात आली यामध्ये १ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत २० टक्के तर १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर यादिवशी ५० टक्के सवलत देण्यात आली होती तसेच दिनांक १९ रोजी मोफत प्रवेश असणार आहे.
कृषिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना चांगले शास्त्रोक्त मार्गदर्शन करणार आहेत असे पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शाकिर अली सय्यद यांनी प्रदर्शनाची माहिती देताना सांगितले कृषिक प्रदर्शनात औषधी वनस्पती, फिनिकास कंपनी के व्ही के रातळ्याची रोपे, बेबीकॉर्न मक्याचे दाणे काढल्यावर राहणाऱ्या भागाचे मुरघास बनवणे, तसेच शुगर बिटच्या २ प्रकारांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. शवंतकर्यांना हे फायद्याचे पर्यायी पीक आहे. वृक्षतोडी वर भविष्यात बंदी येईल अशी परिस्थितीत असताना महाराष्ट्र बांबू बोर्ड हे चोपण जमीनीत चांगले उत्पादन देणारी तसेच याच्या पासून चांगल्या दर्जेदार वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक व माहिती देणार आहेत.
ऐकवा फोनिक्स कंपनी कमी क्षेत्रामध्ये मत्स्य पालन करून यामधून नायट्रेट व नायट्राइट पासून रसायन मुक्त भाजीपाला तयार करून विष मुक्त भाजीपाला करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात, अंजीर फळांचे गटाने शेती करून अंजीरापासून अनेक पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक तसेच सध्या मधमाश्यांचे प्रमाण कमी होत आहे. मधमाश्यांचे संवर्धन करण्यासाठी तसेच तरुणांना मधमाशी पालन मधून रोजगाराची चांगली संधी आहे. शेतकऱ्यांना प्रॉडक्ट्स, ट्रेनिंग व मार्केटिंग याची संपूर्ण माहिती या प्रदर्शनात देणार असल्याचे सांगितले. तसेच रेशीम उद्योग ट्रेनिंग, विषमुक्त शेती यांचे ११४ प्रयोग केले आहेत. यासाठी बँक, नाबार्ड, कंपन्या, यांना एकत्र आणले असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना कमी खर्चात मशिनरी, इकरीसाईड तुर ही कमी पाण्यात तसेच ड्राय भागात याचे चांगले उत्पादन घेऊ शकतो. येणाऱ्या काळात मुरघास शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे. तसेच यंदाच्या वर्षी देखील जनावरांचा शो करणार असून यंदा गाईच्या दुधाच्या स्पर्धा घेणार असल्याचे व त्यांना बक्षीस देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. असे सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले