गोल पोस्ट इतर बारामतीत पत्रकार भवन येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

बारामतीत पत्रकार भवन येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

बारामती: पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शारदा प्रांगण, उद्योग भवनमध्ये बारामती नगरपरिषदेच्या दिलेले पत्रकारभवन येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी पत्रकारिता आपले मनोगत व्यक्त केले. तसेच बारामती नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात दिलेले पत्रकार भवन हे कायमस्वरूपी हक्काचे पत्रकार भवन द्यावे अशी मागणी पत्रकार बंधूनी कडुन करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष संतोष जाधव, राजू कांबळे, तानाजी पाथरकर, बापू शेंडगे, साधू बल्लाळ,अजिंक्य सातकर, स्वप्नील कांबळे, संतोष शिंदे, सुरज देवकाते, सिकंदर शेख, योगेश नालंदे, वैशाली शेंडगे, प्रशांत तुपे सह इतर पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version