पवारांचा गड उद्ध्वस्त करणार आणि बारामती जिंकणार बावनकुळे यांचं विधान!

पुणे, ६ सप्टेंबर २०२२ : प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे, तोही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्मभूमी बारामतीत मिशन बारामती भाजपा ने आजपासून सुरुवात केली आहे. तर विशेष बाब म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरातून आज चंद्रशेखर बावनकुळे दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. या आधी अनेक गड उद्ध्वस्त झालेत. असे व्यक्तव्य करत पवारांच्याच बालेकिल्ल्यात येत बावनकुळे यांनी शरद पवारांना थेट इशारा दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. पण गेल्या ५५ वर्षात पवार एकही निवडणूक हरले नाहीत. तर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांवर तथा भाजप नेत्यांवर देशातल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आलेली आहे. तर दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज बावनकुळे विशेष बैठक घेणार आहेत. सीतारामन या बारामतीत ५ ते ६ वेळा येणार असल्याचे ही सांगितले जाते.

बावनकुळे माध्यमांशी बोलतनी सांगतात की माविआच्या अडीच वर्षातील सामान्यांसाठीच्या योजनांचे ऑडिट करणार तर शिंदे गट आणि भाजप युतीत निवडणुका लढवणार. राज्यात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये बारामतीत भाजपच विजयी होणार.तर राज्यात ४५ प्लस लोकसभा आणि २०० आमदार आणण्याच भाजपचं टार्गेट असल्याचे म्हटलं आहे. तर जनताही आम्हाला कौल देईल याची खात्री आहे.असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा