मित्राच्या बायकोशी अफेअर करणाऱ्या स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

पुणे: स्केटिंग प्रशिक्षकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी(दि.५)रोजी सकाळी हिंजवडीच्या मांरुजी परिसरास घडल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विठ्ठल मानमोडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमध्ये निलेश शिवाजी नाईक (२४) असे खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव आहे. निलेश नाईक हा आरोपीच्या पत्नीला व्हाट्सअॅपवर मॅसेज पाठवत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी कपिल भूपाल नाईक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश नाईक आणि आरोपी विठ्ठल मानमोडे हे दोघे मित्र होते. दोघे ही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या घरी येऊन जाऊन होते. स्केटिंग प्रशिक्षक निलेश हा विठ्ठल याच्या पत्नीला व्हॉटसअॅपवर मॅसेज करत होते. हे आरोपीला समजले होते. त्यामुळे त्याने निलेशला त्या रात्री उशिरा मारुंजी परिसरात नेऊन दारू प्यायला दिली.आणि शुद्ध हरवताच निलेश याच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यात वार करून खून केला आहे. त्यानंतर आरोपी विठ्ठलने पोबारा करत नवी मुंबई गाठली. हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच आरोपी हा नवी मुंबई येथे असल्याची खात्री झाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनीरुद्ध गिझे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता निलेश हे पत्नीला व्हाट्सऍप मसेज करत असल्याने खून केल्याची कबुली आरोपी विठ्ठलने दिली आहे. निलेश यांनी आरोपीच्या पत्नीला काय मॅसेज केले आहेत हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी महिलेची बदनामी होऊ नये, यासाठी मॅसेज सांगण्यास नकार दिला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा